विद्यार्थी दशेत वैद्यकीय क्षेत्रात राज्यस्तरावर ठसा उमठवणाऱ्या भाग्यश्रीची कहाणी

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

 

हिंगोली जिल्ह्यामध्ये एक वसमत तालुक्यातील एक छोटे गाव आहे. त्या गावामध्ये 1993 साली नरवाडे कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला तीची ही कथा, गुंज हे गाव खूप छोटं गाव, ते गाव महाराष्ट्राच्या नकाशात शोधाल तरी सापडणे कठीण असं छोटंसं गाव आहे. गावामध्ये मोजकीच घरे, एकच प्राथमिक शाळा, येथील, शेतकरी वैजनाथ व मिना नरवाडे यांची कन्या, घरची परिस्थिती सर्व साधारण बेताचीच होती, घरी लहान बहीण सुनिता, भाऊ सांभो आणि अमर भाग्यश्री शिकून मोठी व्हावी हिच तीच्या वडीलांची ईच्छा होती.

डॉ भाग्यश्री नरवाडे ती लहान असते वेळी एक प्रसंग आसा घडला त्यांच्या जवळील एक व्यक्ती हे जग सोडून निघून गेले होती ह्या घटनेमुळे त्याच्या मनावरचा झालेला आघात शिक्षणा शिवाय आपल्या पर्याय नाही त्यामुळे एक दृढनिश्चय केला, स्वतःडॉक्टर व लहान बहीण इंजिनिअर लहानपणापासून हा स्वतः दोघीनी ठरवले आणि त्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे.

बालपणापासूनच वाचनाची अभ्यासाची गोडी निर्माण झाली, आता डॉक्टर का व्हावं? तर डाॅक्टर एकमेव असा व्यक्ती आहे दवाखान्यातुन माध्यमातून जनसेवा घडवू शकते, कोणाला काही आरोग्य विषयक प्रॉब्लेम झाला तर ते डाॅक्टर च सोडूवु शकते असे तिला वाटत. आणि बालपणी गावात दवाखाना व डाॅक्टर नसल्यामुळे, तालुका वसमत किंवा नांदेड हे दोन हाँस्पीटलचे पर्याय गावातील लोकांना १० ते ११ किलोमीटर खाजगी वाहनाने जावे लागे. कारण आजही गावात दळणवळणाच्या साधने कमी आहेत, लहान असते वेळी घरातील व्यक्तीना कोणी आजारी असेल तेंव्हा कितीतरी वेळा यांना घेऊन घरातील व्यक्ती पावसापाण्याची किमान दहा ते आकरा किलोमीटर जे वाहन मिळेल ते करून हाँस्पीटलसाठी जावे लागत त्यामुळे सर्वाचे हाल व्हायचे

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी नांदेड येथील प्रतिभा निकेतन स्कुल मध्ये प्रवेश केला.इयत्ता ५ ते ८ पर्यंत आईतुल्य मावशी उज्वला कंधारकर यांच्या कडे राहुन शिक्षण घेतले, पण घरच्या आडचणी मुळे परत गावी जावे लागले, ९ वी १० वी साठी गावात शाळा नसल्यामुळे, गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत प्रवेश घेतला व दररोज ३ किमी चालत जाऊन १०वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले व शाळेत इयत्ता दहावीत शाळेत प्रथम क्रमांक मिळवून उतीर्ण झाली.

पुढे ११वी व १२ विज्ञान शाखेच महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथील, यशवंत महाविद्यालयात पुर्ण केले व वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षेत प्रथम प्रयत्नात अयशस्वी झाले व दुसऱ्यांदा त्यांचा नगर येथील शासकीय अनुदानित जि. एस. गुणे आयुर्वेद महाविद्यालयात BAMS साठी प्रवेश घेतला पण त्या कालावधीत ग्रँट कमिशन व आयुष मंत्रालयात चे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्या वर्षीचे महाराष्ट्रातील बर्याच आयुर्वेद महाविद्यालयाची ग्रँट नाकारली होती…. त्यावेळी त्या खुप हाताश झाल्या होत्या.. कारण सर्वोच्च न्यायालयाने ग्रँट नाकारले तो पर्यंत जवळ जवळ शैक्षणिक १ वर्ष पूर्ण होत आले होते ते वाया गेले. व पुन्हा परीक्षा देण्यासाठी MHT CET आणी NEET परीक्षेच्या अर्ज करण्याची वेळा सुध्दा निघुन गेल्या होत्या त्यात त्यांना गावी परत जावे लागले..

गावातील लोकांचा मानसिकता स्त्री पुरुष समानतेची नव्हती, गावातील बरेच लोक वडीलांना सल्ला द्यायचे मुलीला कुठे शिकवतोस, लग्न करुन टाक,असा सल्ला दिला नातेवाईक लोक टिंगल टाँट मारायचे त्याचे प्रयत्न जनु काही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
या कवितेस तंतोतंत त्यांना लागू पडतात

त्या पडत्या काळात आई-वडीलांची त्यांना साथ खंबीर होती,वास्तविक पहाता आई वडीलांची त्यांना शिकवण्याची परीस्थिती नव्हती पण आई वडिलांनी स्वतः कितीही त्रास झाला तरीही शिक्षणासाठी काही कमी पडु द्यायचे, आशा परीस्थितीत आई वडील त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिले आणी त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करत असे सांगितले त्या वेळी खाजगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या असोसिएट प्रवेश परीक्षा व्दारे होत असे त्याचा त्यांनी अर्ज भरून परीक्षा दिली आणि त्या बद्दल त्याच्या एका मैत्रीणीने मार्गदर्शन केले आणि त्यांच्या नंबर आदित्य आयुर्वेद महाविद्यालय बीडमध्ये BAMS साठी प्रवेश मिळवला.

वैद्यकीय शिक्षण घेते वेळी ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाविदलयाचे विद्यापीठ प्रतिनिधित्व केले, वैद्य बिंदू माधव कट्टी ,समर्नाथ राज्यस्तरीय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, व आयुष विभागाची परवानगीचे प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सक्रीय सहभाग व क्रीडा स्पर्धेत ही सक्रीय सहभाग आसाचा त्याच बरोबर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात असते वेळी प्राँक्टीस करण्यासाठी त्या खाजगी रुग्णालयात सुध्दा कार्यरत असायचे, घरची परीस्थितीत नाजुक होती म्हणून त्यांना झालेला त्रास त्यांनी घरी न सांगता त्यावरती स्वत: आलेल्या परिस्थितीशी दोन हात करायचे, ते वैद्यकीय पदवी शिक्षण घेतेवेळी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत होत्या कारण त्यांची लहान बहीण सुनिता नरवाडे , संगणक अभियांत्रिकी चे शिक्षण घेत होती तीची शैक्षणिक खर्च दोघींचा खर्च करतेवेळी वडीलांची खुप हाल व्हायचे पण आई वडीलांनी वेळ प्रसंगी कर्ज काढून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या याची जाणीव ठेवत डाॅक्टर नरवाडे ह्या आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले पुढे ते पुणे येथे प्रशिक्षणार्थी डाॅक्टर म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय चाकण व ग्रामीण रुग्णालय येळशी ता मावळ जि पुणे येथे त्यांनी सेवा दिली.

रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलेच्या आहार, विहार आणि गर्भसंस्कार या बद्दल जागृती केली या दरम्यानच्या काळात त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालय वारा घेतली जाणारी वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेची तयारी करुन त्यांनी त्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आणि नांदेड येथील पदव्युत्तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात MD प्रवेश मिळाला. आपले आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन गाव खेड्यात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन मार्गदर्शन व आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देत केले.

डॉ नरवाडे हे आयुर्वेद ही सर्वात जुनी व सर्व वैद्यकीय क्षेत्राताचा पाया आसल्याचे सांगतात त्यांना आयुर्वेदा वर प्रचंड निष्ठा व श्रध्दा विश्वास आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत नांदेड येथील सन २०२० मध्ये जागतिक महिला दिना निमित्त नांदेड येथे कुसुमताई चव्हाण महीला भुषण पुरस्कार कतृत्वान महीला म्हणून विशेष सन्मान पुरस्कार देऊन माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री, अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर काही दिवसात जगावर आलेल्या कोरोना महामारीत ही त्यांनी कसलीही भिती न बाळगता ते कोव्हीड केअर सेंटर मध्ये काम करतात त्या वेळी त्याच्या कडे पाहून त्यांनी स्वतः च्या प्राणाची परवा न करता देशा साठी त्यांनी कोव्हीड केअर सेंटर मध्ये काम केले त्यांच्या या कार्यास

न इज्जत दे..
न अजमत दे..
न सिरत दे..
न सुरत दे..
मेरे वतन के खातिर..
मेरे रब सिर्फ मरने कि हिम्मत दे !
कवीता लागु पडते असे वाटते.

त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने कोरोना बाधित आणि संशयित रुग्णावर उपचार करण्यासाठी केंद्रीयआयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्त्वा नुसार त्यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा राजेश टोपे यांच्या कडे पत्रा व्दारे मागणी केली व सदर कल्पना त्यांनी त्यांच्या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थी असोसिएशन कडे मांडले व त्यास असोसिएशने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सकारात्मक दर्शवत नांदेड येथील दोन कोविड केअर सेंटर मध्ये केंद्रीयआयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्त्वा नुसार आयुष काढा वितरणाची परवानगी नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मार्फत मा जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या परवानगीने दोन कोव्हीड केअर सेंटरमध्ये आयुष काढा वितरण नांदेड येथे २ ते १५ जुन दरम्यान पदव्युत्तर विद्यार्थी असोशिएशनच्या विद्यार्थीच्या स्वखर्चातून वाटप केले.

या उपक्रमाची दखल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन सदर उपक्रम राबविल्या बदल अभिनंदन केले विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थी असोशिएशन आयुष काढा वितरण हा उपक्रम राबविले होते. असे दमदार प्रचंड इच्छा शक्ती आयुर्वेदावर प्रचंड श्रध्दा विश्वाास आसलेल्या कोव्हीड वाँरीअर ला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!