कु.श्रेया संजय वाघमारे हिचे राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत यश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

शहरातील एका इंग्लीश स्कुल मध्ये शिकत असलेली कु.श्रेया संजय वाघमारे हिने राज्यस्तरीय ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षेत उत्तेजनार्थ यश संपादन केले आहे.

ज्युनीयर आय.ए.एस. परिक्षा ही संपुर्ण महाराष्ट्रात होत असते यात मुखेड शहरातील व्यापारी तथा विश्व हिंदु परिषदचे शहरमंत्री असलेले संजय वाघमारे यांची मुलगी कु. श्रेया वाघमारे हीने  भाग  घेतला  असता उत्तेजनार्थ यश संपादन केल्यामुळे तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

तीच्या यायशाबद्दल आजोबा अशोक वाघमारे, वडील संजय वाघमारे, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, किसान सेनेचे शंकर पाटल लुट्टे, ज्ञानेश्वर  डोईजड, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले, योगेश पाळेकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.