नांदेडच्या आमदारास कोरोना ….!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड: माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक काँग्रेस आमदार कोरोनाने बाधित झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाने पूर्णतः बरे होऊन शुक्रवारी नांदेडला परतले. त्यानंतर काँग्रेस आमदारच कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समजल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रथमच निवडून आलेले हे आमदार आहेत. माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवाच्या संपर्कात आले असल्याने रविवारपासून ते क्वारंटाईनमध्ये होते. शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रात्री नऊ वाजता त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी शंका आल्याने त्यांनी आपल्या लाळेचे नमुनेही दिले. मध्यरात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे आमदार आपल्या मतदारसंघात कोरोना उपाययोजना कामातही खूप मेहनत घेत होते. त्यांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे.