कोरोना ’ व्हाया बिदर (कर्नाटक) मार्ग देगलुर शहरात प्रवेश

ठळक घडामोडी देगलूर नांदेड जिल्हा

 

देगलुर : राजु राहेरकर
आज देगलुर शहर लाईन गल्ली भागातील ५९ वर्षीय महिलेचा ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ संभाजी पाटील यांनी दिली. सदरील महिला ही पंधरा दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील बिदर येथील तिच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभातुन तिच्या घरी परत आली पण सोमवारी अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांना संशय आल्या मुळे तिचा ‘कोरोना विषाणू’ बाबतीत चा स्वॅब घेऊन तपासणी साठी पाठविले व आज दुपारी सदरील महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
सदरील महिलेच्या कुटुंबात केवळ दोन च सदस्य ती आणि तिचा मुलगा हे दोघेच राहतात तेव्हा त्या महिलेला मुखेड येथील कोव्हीड सेंटर ला हलविण्यात आले असून सदरील महिलेला ‘ निमोनिया ’ हा पण आजार असल्याने तिची तब्येत अजुन खालावण्याची शक्यता तेथील डॉक्टरांनी वर्तविली आहे. म्हणून पुढील उपचारा करीता तिला नांदेड येथे हलवावे लागेल आणि तिचा मुलगा पण सोबतच असल्यामुळे त्याचा पण स्वॅब घेण्याची प्रक्रिया चालू असल्याचे वृत्त समजते.

देगलुर शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी व अतिआवश्यक काम असेल तरच मास्क, सॅनिटाइजर चा वापर करावे आणि घराबाहेर पडावे व सामाजिक अंतर ठेवूनच आपली कामे करावी.
डॉ. संभाजी पाटील
वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय देगलुर