मुखेड तालुक्यातील सोयाबीनचे पंचनामे करण्याचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आदेश ……कलंबरकर यांच्या मागणीला यश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली पण उगवन न झाल्याने शेतकरी हतबल झाल्याने उपविभागीय कृषि अधिकारी एम.के. सोनटक्के यांनी दि. २१ रोजी सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

तालुक्यात सोयाबीनचे उगवन न झाल्याने रयत क्रांती संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी सोयाबीनचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनास दि. १९ रोजी निवेदन दिले होते.