दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत ३० जुन रोजी तोंडाला काळी पट्टी व था़लीनांद करुन मेसेज भेजो आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत दि ३०जुन २०२० रोजी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी तोंडाला काळी पट्टी व था़लीनांद करुन मेसेज भेजो आंदोलन सहभागी व्हावे असे यादव फुलारी यांनी केले

मुखेड दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृध्द ,निराधार बांधवाना खालील शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने दि.३० जुन २०२० रोजी घरोघरी तोंडावर काळि पटि व हातात थालीनांद करून शासन, प्रशासनास मेसेज पाठवूनआपला संताप व्यक्त करण्यासाठी मुखेड तालुक्यात तहसीलदार साहेब. गटविकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात खालील बारा विषय मांडण्यात आले. ते शासन जागतिक करोणा संकटकाळी लेखी आदेश देऊन
त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे खालील

१) दिव्याग आयुक्त पुणे यांचे लेखी आदेश दि.२६ मार्च २०२०च्या लेखी आदेशात दिव्यांगाना एक महिन्याचे धान्य किट /आरोग्य किट दिव्यांगाना घरपोच देण्यात यावे व ज्या दिव्यांगाना अन्न शिजवता येत नसलेल्याना नास्टा/जेवन/डबे देण्याचे आदेश देऊन तिन महिन्यात अंमल बजावणी झाली नाही .
२) मा मुख्य कार्यकारी अधिकारी जी प नांदेड दि ११ एप्रिल २०२०ला लेखी आदेश देऊन मा दिव्यांग आयुक्त साहेब यांच्या संदर्भात सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देऊन सुध्दा गटविकास अधिकारी अंमलबजावणी केली नाही.
३) मा.ऊप सचिव साहेब यांचे क्र विसयो २०२०/प्र. क्र७०/दि. २३एप्रिल २०२० यांच्या लेखी आदेशातुन केंद्र शासनाच्यानिर्देशा नुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याचे आदेश देऊन सुध्दा अद्याप दिव्यांग. वृध्द निराधार याना मिळणाऱ्या वाढीव अनुदान मिळाले नाहि.
४) मा दिव्यांग आयुक्त पुणे यांनी दि ८मे ला लेखी आदेश देऊन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे पर क्र. दिकआ/को१९/प्रस्ताव /२०२०/११२५ दि८मे २०२० ला लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
५) दिव्यांग आयुक्त पुणे प्रक्र११२६ दि ८मे २०२०ला लेखी आदेश देऊन म. रा. ग्रामीण जीवनोन्नति अभियान द्रारेद्र निरमुलनाच्या कार्यक्रमामध्ये ५ टक्के स्वय सहाय्यता गट दिव्यांग व्यक्ती करिता राखीव ठेवण्यात यावा असे लेखी आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी होत नाही.
६) मा. अति. मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय
जिल्हापरिषद/पंचायत समिती यांच्या उत्पन्नातुन ५टक्के निधीतुन दिव्यांंगासाठि राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजना संदर्भात शासन निर्णय २ क्र. ११मधील परिछेद १ मधील वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये ३६ वर खालील प्रमाणे वाढ करुन अन्न व खाद्य पदार्थ या जिवनाश्यक वस्तूचा धान्य किट देण्यासाठी २६ मे २० आदेश दिल्यानंतर सुध्दा अंमलबजावणी होत नाही
७) दिव्याग बांधवांना जिल्हा परिषद नांदेड याचा २०१६ ते २०२० पर्यत दिव्यांग निधी दरवर्षी वाटप करण्यात यावा असे शासन निर्णय असताना फक्त एकच वर्षाचा निधी वाटप करण्यात आला ते दिव्यांग बांधवांनी अनेक आंदोलने केल्यामुळे बाकी तिन वर्ष निधी का मिळत नाही
८) दिव्याग निधी पंचायत समिती चा निधी अध्याप का वाटप होत नाही पंचायत समिती व जिल्हा परिषद निधी वाटप होत नसेल तर ग्रामपंचायत चा निधी मिळेल काय?
९) नगरपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका दिव्यांग निधी दरवर्षी वाटप केले जात नाही
१०) खासदार आमदार यांच्या विकास निधीतून त्यांच्या मतदारसंघात दिव्यांग बांधवाना निधी देण्याचा आदेश असताना अद्याप दिव्यांगाना निधी मिळत नाही
११) दिव्यांग वृध्द निराधार याना मिळणाऱ्या अनेक योजनेची मिटिंग चार ते सहा महिने होत नाहि व त्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही
१२) दिव्यांग बांधवाना आपल्या हक्काची जाणिव शासन प्रशासनास कळावी म्हणून त्यांना प्रत्येक कमिटीत अशासकीय सदस्य म्हणुन त्यांची निवड करण्यात यावी असे शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि
अशा अनेक प्रश्नाबाबत शासन प्रशासनास निवेदन आपले सरकार पोर्टलवर देऊन सुध्दा शासन प्रशासन दखल घेतली जात नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगानी दि २२ मे २० ला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी एका दिवसाचे एक हजार दिव्यांगानी उपोषण करुन प्रशासन साधी दखलही घेतली नाही पण शासन निर्णय दिनांक २६ मे २०२० रोजी आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी दिव्यांग वृध्द निराधार हे आपल्या घरीच तोंडावर काळि पटि बांधुन थालीनांद करून आपले फोटो व निवेदन ,सकाळि १०ते सायं ६ वाजेपर्यंत आपल्या जिल्ह्यातील खासदार, आमदार,दिव्यांग आयुक्त पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, यांच्या मोबाईल वर पाठऊन आपला संताप व्यक्त करतील असे निवेदन बिलोली ता अध्यक्ष , मुखेड ता अध्यक्ष सुदर्शन सोनकांबळे,जाधव ज्ञानेश्वर, राजू कुंचलवाड, यादव फुलारी, पांडुरोग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हनमत हेळगिर, बालाजी गवाले, योगेश्वरी बरगे, शेख शादुल, शिवाजी गोरे इत्यादि ईत्यादी
असे प्रसिध्द ता ऊपअध्यक्ष यादव फुलारी यांनी दिले