नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुखेडमधील ८ विद्यार्थ्यांची निवड

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

जानेवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मुखेड तालुक्यातील ८ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले असून त्यांची शंकरनगर येथील नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे.  विशेष म्हणजे निवड झालेले ८ ही विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यात ३ मुली व ५ मुलांचा समावेश आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील ८० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात येते. यावर्षी तालुक्यातील एकूण १   हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर १ हजार  ४३४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.त्यापैकी ८ म्हणजे १०% विद्यार्थ्यांची निवड झाली असून मुखेड तालुका जिल्ह्यात सर्वाधिक यशस्वी तालुका ठरला आहे.

 

प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कु.अनुष्का विठ्ठल धनगे(जि.प.प्रा.शा.मंडलापूर),कु.संचिता गजानन गाडले(किसान विद्यालय, उमरदरी),कु.ममता रमाकांत पाटील(स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल बाऱ्हाळी),विश्वदीप बाबुराव वाघमारे(जि.प.प्रा.शा.जांभळी), पद्माकर अंकुश धोतरे(कें.प्रा.शा.होनवडज), ज्ञानेश्वर नागनाथ कोटपलवाड(ब्राईट स्टार इंग्लिश स्कुल उमरदरी), भागवत रामदास टेकाळे(ब्राईट स्टार इंग्लिश स्कुल उमरदरी), साईप्रसाद तानाजी कोलेवाड(संत कैकाडी महाराज प्रा.शा.बाऱ्हाळी) यांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम भारती,विस्तार अधिकारी बी.एम.पाटील,मनीषा बडगिरे, शिवशंकर जांपलवाड,गजानन होनराव, संगणक विभाग प्रमुख शिवाजी कराळे,परीक्षा प्रमुख सायलू करेवाड, श्रीकांत थगणारे, वसंत सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.