Wednesday, March 03, 2021

महाविकास आघाडीच्या कर्जमाफीत बिघाडी…आधार कार्ड एकाचे तर नाव दुसऱ्याचे, शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिराव  फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गंत शेतक­ऱ्यांना ऑनलाईल करुन घ्यावे असे सांगितले पण ऑनलाईन करतेवेळेस आधार कार्ड देऊन अंगठा केल्यास दुस­ऱ्याच शेतकऱ्याचे नाव समोर आल्याने  महाविकास आघाडीच्या कर्जमाफीत बिघाडी  झाल्याचे  समोर  आले  असून  शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट उभे  टाकले  आहे . लोकभारत न्युज

मुखेड तालुक्यातील सचिन उत्तमराव श्रीरामे या युवा शेतक­ऱ्याने कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी केंद्रावर गेला असता त्याने आपला आधार कार्ड नंबर दिला व ऑनलाईन केले त्यावेळेस आधार कार्ड स्वत:चे असुनही माहिती मात्र इतर शेतकऱ्याची दिसुन आली.अगोदरच कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी मेटाकुटीला आला असताना अशा भोंगळ कारभारामुळे शेतकरी अजुन मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्याच्या या प्रश्नावर कोणीही त्यास समर्थपणे उत्तर दयायला तयार नाही. हे काम ऑनलाईनचे असुन वरुनच असे झाले असल्याचे ऑनलाईन करणाऱ्याकडुन सांगितले जात आहे.

राज्य सरकारडुन अगोदरच अंगठा न लावता, रांगेत उभे न टाकता, कोणताही ऑनलाईन फॉर्म न भरता  शेतक­ऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे सांगितले होते पण अजुन शेतक­ऱ्यांना रांगेत उभे करुन शेतक­ऱ्यांची पुन्हा फरफट होत असल्याचे दिसत आहे.


         दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक­ऱ्यांची अशा प्रकारामुळे तारांबळ उडत असुन शेतक­ऱ्यांना शारीरीक, मानसिक,आर्थिक त्रास होत आहे त्यामुळे कर्जमाफीची पावती कोणतीही गफलत न होता प्रत्यक्ष त्याच्याच नावाची पावती शेतक­ऱ्यांना मिळाली पाहिजे असे युवा शेतकरी सचिन श्रीरामे यांनी तहसिलदार यांना दि. २३ रोजी तक्रार देऊन आपले म्हणणे मांडले आहे.

error: Content is protected !!