नांदेडमधील पिरबुऱ्हांन नगर भागात सापडले आणखी 3 नवे रुग्ण… जिल्ह्याचा एकूण आकडा 317

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड :  दिनांक 22 जून 2020 रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 14 रुग्ण व मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5 रुग्ण असे एकूण 19 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची एकूण संख्या 238 एव्हढी झाली आहे.

तसेच सोमवार 22 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 59 अहवाला पैकी 45 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत व यातील 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत व यामध्ये आदिलाबाद येथून 1 रुग्ण हा नांदेड येथे संदर्भीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 317 एवढी झाली आहे.

आज सायंकाळी 5 वाजताच्या अहवाला नुसार नांदेड जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

☑️ धोबी गल्ली गाडीपुरा येथील एक पुरुष रूग्ण : वय – 40
☑️ रहेमत नगर येथील एक पुरुष रुग्ण : वय – 22,
☑️बिलाल नगर येथील दोन पुरुष रूग्ण : वय – 37 व 57.
☑️पिरबुऱ्हाण नगर येथील 3 पुरुष रुग्ण : वय – 26, 29 व 31.
☑️भगतसिंग रोड येथील एक पुरुष रुग्ण : वय – 38.
☑️पिंपळगाव ता. नांदेड येथील दोन महिला रुग्ण : वय – 18, 38.
☑️चिखलभोशी येथील एक महिला रुग्ण : वय 45.
☑️आणि रीसनगाव येथील एक महिला रुग्ण : वय 19.
असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार जिल्ह्यातील 12 पोझीटिव्ह रुग्णांचा तपशील आहे.
व सदरील सर्व रुग्णांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत 317 बाधितांपैकी 238 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 14 प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरीत 65 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. तर 7 बाधित व्यक्ती उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 12 +1 संदर्भित पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 317 वर.
☑️ दिवसभरात 19 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 238 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️14 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️65 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ 7 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
☑️पुणे-हैद्राबाद-आदिलाबादचे 4 रुग्ण उपचारास्तव नांदेड येथे संदर्भित.

रविवार 22 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे