मदुरा मायक्रोफायनन्सच्या वतीने पोलिसांचा सन्मान करीत मास्क सॅनिटायझर वाटप

ठळक घडामोडी देगलूर नांदेड जिल्हा

मुखेड / संदिप पोफळे

मदुरा मायक्रोफायनन्स लि. च्या वतीने सामाजिक बांधीलकी जोपासत कोरोनाच्या संकटकाळात पोलिसांचा सन्मान करीत मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यात नांदेड जिल्हयातील देगलुर पोलिस ठाण्यासह महाराष्ट्रातील 12 जिल्हयात अन्य 50 पोलिस ठाण्यात पुष्पगुच्छ व विविध सुरक्षा वस्तुंचे (मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हस) वाटप करुन कोरोना सारख्या महाभयंकर महामारीत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

मदुरा मायक्रोफायनन्स लि. हे आर.बी.आय. मान्यताप्राप्त असुन ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांसाठी व्यवसाय, आर्थिक वृध्दीसाठी उत्तम सेवा देण्याकरीता प्रयत्नशिल राहिली असुन यापुर्वी रक्तदान, वक्षारोपन,आरोग्य तपासणी,पुरग्रस्त मदत असे विविध उपक्रम राबविले आहेत.