रानडुकराच्या धडकेने सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील सावरगाव पी. येथील सेवानिवृत्त शिक्षक सिद्राम केंद्रे यांचा रानडुकराच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना दि २० जुन रोजी घडली.

मुखेड तालुक्यातील सावरगाव पि. येथील सेवानिवृत्त सिद्राम केंद्रे वय ६३ वर्ष व त्यांचा मुलगा कृष्णा केंद्रे वय २० वर्ष हे दोघेजन दि १० जून रोजी आपल्या सावरगाव पी.येथील शेतातील काम आटपून मुखेडकडे येत असताना शिरूर दबडे येथील पाटीजवळ अचानक रानडुकर येऊन गाडीला जोराची धडक दिली. या धडकेत सिद्राम केंद्रे यांना डोक्याला जबर मार लागला तर त्यांचा मुलगा कृष्णा केंद्रे यास किरकोळ दुखापत झाल्याने दोघांनाही नांदेड येथील
खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यात सिद्राम केंद्रे यांना जबर मार लागल्याने उपचारा दरम्यान दि २० जुन रोजी मृत्यू झाला.
तर २१ जुन रोजी सकाळी त्यांच्यावर सावरगाव पि.येथे
अंत्यसंस्कार करण्यात आले असुन त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन मुली असा परिवार आहे.
तर या घटनेची माहिती मुखेड पोलीस स्टेशन व वनपरिक्षेत्र अधिकारी मुखेड यांना देण्यात आलेली आहे.