मुखेडात अजुन दोन रुग्ण वाढले…. दिवसभरात आढळले 6 रुग्ण तर तीन दिवसात 13 रुग्णांची भर …. नांदेड जिल्ह्यात आज 24 रुग्णांची नोंद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेडात दि. 16 रोजी सांयकाळी 4.30 च्या अहवालात दोन रुग्णांची भर पडली असुन सकाळी मुखेडात 4 रुग्ण आढळले होते दिवसभरात मुखेडमध्ये सहा रुग्णांची नोंद झाली आहे.

या दोन रुग्णांत एक महिला वय 65 व एक पुरुष 55 वर्ष असे असुन त्यांना मुखेड येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया केली जात आहे.

मागील तीन दिवसात 13 रुग्णांची नोंद झाली असुन सर्वांनाच उपचारासाठी मुखेड येथील कोव्हिड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.


आज दि. 16 रोजीच्या अहवालात नांदेड जिल्हयात 278 अहवालापैकी 230 अहवाल निगेटिव्ह आले असुन 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत जिल्हयाची एकुण रुग्णसंख्या 286 झाली आहे. नागरीकांनी कामाशिवाय बाहेर येऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.