मुखेड मध्ये अजून पाच रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह ; रात्री उशिरा आला अहवाल….रुग्णात……..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

त्या दोन रुग्णांच्या संपर्कातील घेतलेल्या नमुन्यात पाच जणांचा अहवाल रात्री उशिरा पॉजिटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या अहवालात एकाच कुटुंबातील तिघे तर एक व्यापारी व एक राजकीय नेता असल्याची माहिती आहे.

रुग्णाचे वय 62, 55, 52, 52 व 47 असे आहे. अजून पाच रुग्ण वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण असून या पाच रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुखेड मध्ये हे पाच व अगोदरचे 2 असे 7 जणांवर उपचार चालू असून याअगोदर 8 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 अशी झाली आहे.

 


97 अहवालापैकी 5 पॉजिटिव्ह अहवाल आले आहेत तर 10 अहवालांची तपासणी चालू असल्याची माहीती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली .