रामदास पाटील सुमठाणकर मिञ परिवाराच्या वतीने गोजेगाव येथे दिव्यांग कुटुंबांना मदत…..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद :दत्ता पाटील माळेगावे 

देशात कोरोनाने थैमान घातला असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून केंद्र व राज्य शासनाने देशात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन केले असून अनेक गरीब कुटुंबाचे असलेले उद्धारनिर्वाहाचे साधन या कोरोनाने हिरावून घेतले असल्यामुळे दिव्यांग कुटुंबांचा अन्न धान्येचा प्रश्न उभा टाकल्यामुळे रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा या माध्यमातून गोजेगाव येथील दिव्यांग कुटुंबाला अन्न,धान्याचे किठ घरपोच वाटप करण्यात आले.

 

या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब कुटुंबाच्या हाताला कामे नाहीत. खर्च करण्यासाठी घरात पैसे नाहीत. मग अशा भयाण अवस्थेत आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या चितेंत अनेक गरीब कुटुंब वावरत असताना. माञ रामदासजी पाटील सुमठाणकर , मिञ परिवाराने एक निस्वार्थ भावनेचा वसा घेऊन गरीब कुटुंबाची मदत करण्यासाठी समोर सरसावली असून
मुखेड तालुक्यातील शहर, गाव,वाडी,तांड्यावर असलेल्या सर्व गरीब कुटुंबाना अन्न.धान्याचे घरपोच वाटप करणे अविरत चालु ठेवले असल्यामुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

एक हात मदतीच्या माध्यमातून तालुक्यातील गोजेगाव येथील गरीब व हातावरचे पोट असणाऱ्या दिव्यांग कुटुंबाला घरपोच अन्न ,धान्याचे वाटप केले आहे. या लॉकडाऊन मध्ये केलेली ही, मदत लाख मोलाची ठरत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता निर्माण झाली आहे.

 

या निस्वार्थ व मानवाता धर्म म्हणून मदत करत असल्यामुळे रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परीवाराचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. यावेळी युवा नेते दत्ता पाटील गोजेगावकर, माजी सरपंच बालाजी पाटील गोजेगावकर, ज्ञानोबा पाटील रावणकोळे, भिमप्पा खेंगटे,राजु अगडे, नारायण शाहु, बालाजी देशमुख, राजु सुगावे, बालाजी गिरी, उत्तम वळगे, विश्वंभर टिपराळे, पत्रकार दत्ता पाटील माळेगावे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती..