मुक्रमाबाद परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पाऊसाची दमदार एंट्री… पावसामुळे देगलुर-उदगीर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

दत्ता पा.माळेगावे
मुक्रमाबाद

मृग नक्षत्राला सुरुवात होऊन तिन ते चार दिवस झाले तरी मुक्रमाबाद परिसरात बुधवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान बहुतांश भागात मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडला.

मुक्रमाबाद परिसरातील गोजेगाव, कोटग्याळ गोणेगाव, सावरमाळ, रावी, हाळणी या गावात चांगला पाऊस पडला. मृग नक्षत्राचा पहिला पाऊस मुक्रमाबाद परिसरात पडला आहे. एक दोन मोठे पाऊस पडले तर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिलेच लाँकडाउनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आतातरी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली तर परिसरातील बळीराजा सुखावला जाईल.

देगलूर – उदगीर रोडवर मुक्रमाबाद पासुन ५ किलोमीटर अंतरावरील धडकनाळच्या पुलावरून मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाचे पाणी वाहु लागल्याने दोन तास वाहतूक ठप्प…