कोरोनामुक्त झालेल्या मुखेडात पुन्हा सापडले दोन रुग्ण ; नांदेडमध्ये नवीन 21 रुग्ण आढळले … नांदेडमध्ये रुग्ण संख्या झाली 224

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले होते डॉक्टराच्या उपचारानंतर तालुका कोरोनामुक्त झाला होता पण दि. 11 रोजीच्या सायकाळी 5 च्या आलेल्या अहवालात मुखेड शहरात दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

शहरातील विठठल मंदीर परिसरातील एक रुग्ण तर अहिल्याबाई होळनगर नगर मधील एक असे दोन रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाच्या वतीने हा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालु असुन तालुक्यात व्यवहार पुर्वपदावर आले असताना पुन्हा मुखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने वातावरण भयभयीत झाले आहे.

आज दिनांक 11/ 6/ 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 89 यापैकी 62 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले वनवे 21 रुग्णांचा पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 224 एवढी झाली आहे .

 

आज प्राप्त झालेल्या 21 पॉझिटिव रुग्णांपैकी चौफाळा भागातील एक स्त्री वय वर्ष 52 विभागातील एक पुरुष वय वर्ष 52 खोजा कॉलनी भागातील एक रुग्ण पुरुष वय वर्ष 67 उमर कॉलनी भागातील एक रुग्ण वय वर्षे सोळा देगलूर नाका भागातील दोन रुग्ण एक स्त्री वय वर्ष 26 व एक पुरुष वर्ष 16 इतवारा भागातील पाच रुग्णांपैकी चार पुरुष रुग्ण वय वर्ष अनुक्रमे 16, 26 ,28, 62 व स्त्री रुग्ण 50 तसेच गुलजारबाग भागातील आठ रुग्ण पैकी तीन पुरुष वय वर्ष अनुक्रमे 35, 41, 38 व पाच स्त्री वय वर्ष अनुक्रमे 3, 10, 28 ,34 ,38 असे आहेत.

 

मुखेड शहरातील दोन पुरुष रुग्ण वय 45 होळकर नगर येथील व एक रुग्ण वय वर्ष 55 विठ्ठल नगर परिसरातील आहेत सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे .

 

आतापर्यंत 224 रुग्णांपैकी 139 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 74 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन रुग्ण त्यापैकी एक स्त्री रुग्ण ज्याचे वय 65 आणि दोन पुरुष ज्याचे वय 38 व 74 वर्षे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे