मुखेडात खते – बियाणात शेतक­ऱ्यांची लुट ; दुकानदारांवर कार्यवाही करण्याची प्रहारची मागणी …. बिना पावती शेतक­ऱ्यांना माल, प्रशासनाचे दुर्लक्ष ! लुट होणारी दाखवा ? कृषि अधिका­ऱ्याचा अजब गजब सवाल !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यात खते – बियाणात शेतक­ऱ्यांची खत दुकानदार सर्रास लुट करीत असुन याबाबत कार्यवाही करण्याची करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मन्मथ खंकरे यांनी दि  १६ रोजी तालुका कृषि अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

शेतक­ऱ्यांना  पेरणीपुर्व खत – बियाणे खरेदी करावी लागतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकटामुळे शेतक­ऱ्यांची आर्थिक व्यवस्था कोलमडली असुन अनेक शेतक­ऱ्यांनी उसणे पासणे करुन बियणे खरेदी करीत आहेत पण तालुक्यातील अनेक खत दुकानदार शेतक­ऱ्यांची आर्थिक लुट करीत असताना प्रशासन मात्र डोळे उघडे ठेवून पाहत आहेत.

शेतक­ऱ्यांनी मागितलेली खते – बियाणे न देताना अडवणूक करुन व्यापा­ऱ्याकडुन खत बियाणांच्या साठवणूक करुन बेभाव दराने विक्री करीत आहेत. शेतक­ऱ्यांना योग्य भावात हवी असलेली बियाणे मिळत नाहीत.बांधावर खते देण्याची घोषणा सरकारने केली मात्र ती हवेत विरळ झाल्याचे दिसून येते.

शेतक­ऱ्यांची होणारी लुट थांबवून दुकानदारांचे  कृषि परवाने रद्द करावे व शेतक­ऱ्यांना योग्य हमी भावाचा माल दयावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मन्मथ नागनाथअप्पा खंकरे, सतिष पंढरीनाथ सकरगे,गिरीधर बाबुराव शिंदे,राहुल सिध्देश्वर कंदमवार यांनी केली आहे.


शेतक­ऱ्यांना  खते व बियाणांची पावती देणे आवश्यक असताना दुकानदार शेतक­ऱ्यांना खरेदी केलेली पक्की पावती देत नाहीत प्रशासनाच्या वतीने शेतक­ऱ्यांची लुट होऊ नये म्हणुन भरारी पथक नेमले असुन हे भरारी पथक नावालच असुन कुठेही फिरताना दिसत नाही यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसुन आहे.


लुट होणारी दाखवा ? कृषि शेतक­ऱ्यांचा अजब गजब सवाल !

तालुक्यात शेतक­ऱ्यांची उघडया डोळयांनी होणा­या लुट बद्दल व भरारी पथकाबद्दन विचारले असता लुट होणारी दाखवा आम्ही तिथे कार्यवाही करु असा अजब गजब सवाल मुखेड तालुका कृषि अधिकारी एस.बी.शितोळे यांनी केला.