विनोद आपटे यांचा कोव्हिड योद्धा म्हणून गौरव ….

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन क्यादरकुंटे 

कोरोनाच्या या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत गरीब कुटुंबाना सतत अन्न.धान्याची मदत व आरोग्य तपासणी करून मोफत उपचारासह दैनंदिन गरजेची मदत करून सहानुभूती ठेवणाऱ्यांचा “सप्तफेरे वधु-वर सुचक संस्थे कडून २०२० या वर्षीचा कोव्हिड योद्धा हा सन्मानाचा पुरस्कार मुक्रमाबाद (ता.मुखेड) येथील पञकार , विनोद नारायणराव आपटे , यांना देऊन गौरविण्यात आले.

लातुर येथील सप्तफेरे वधु-वर सुचक या संस्थे कडून दर वर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येतो. पण या वर्षी देशात कोरोनाने हाहाकार माजविला असून सुरक्षेच्या कारणामुळे देशात तीन महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. या दरम्यानच्या काळात अनेक गरीब कुटुंबाचे उदारनिर्वाचे साधन हाताचे निघून गेल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे टाकले होते. या काळात गरीब कुटुंबाना अन्न .धान्याची मदत करत त्यांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोउपच्चार करून त्यांना सहकार्य केल्या बद्दल पञकार विनोद नारायणराव आपटे, यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह व प्रशसति पञ देऊन गौरविण्यात आले.

मिळालेल्या या गौरवा बद्दल रामदासजी पाटील सुमठाणकर, गंगाधर चामलवाड, राम सावळेश्वर, व्यंकटराव सुवर्णकार, महादेव गोजेगावे, इसाक तांबोळी, संतोष हेस्से, शिवशंकर पाटील कलंबरकर, मन्मथ खंकरे, दिनेश आवडके, मझर पठाण सुधाकर पवार, शिवानंद घाळे, अदिनी अभिनंदन केले.