मुखेड तालुका कोरोनामुक्त ; सर्वच स्तरातुन डॉक्टरांचे व सहकारी कर्मचा-यांचे अभिनंदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड / संदिप पिल्लेवाड

कोरोना विषाणुने सर्व जगात थैमान घातले असुन त्याबरोबर देशात व राज्यात पण कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. तारीख २२ मार्च पासुन देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली होती तरीपण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती.

त्याबरोबर कोरोना रुग्णाची गैरसौय होऊनये म्हणुन मुखेड शहरात कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत कोरोना रुग्णालयात एकुण ८ कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले होते पण दि. ९ जुन रोजी सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने मुखेड तालुका कोरोना मुक्त झाला आहे.

आजपर्यंत एकुण प्रवासी व सर्वेक्षणाद्वारे २२९२९ व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत लक्षणे असलेल्या एकूण 253 रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 245 रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून दिनांक 9 जून रोजी दोन जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यापैकी एक रुग्ण देगलूर तालुक्यातील आमदापुर येथील आहे. अशी माहिती मुखेड तालुक्यातील नोडल अधिकारी डॉक्टर नागेश लखमावाड यांनी दिली.
मुखेड तालुका दिनांक 9 जून रोजी कोरोना मुक्त झाल्याने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर व सर्व सहकारी कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..