बंधपत्रित अधिपरिचारिकांचे सेवा नियमतीसाठी धरणे आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  जगडमवार 

दि  १५ एप्रिल २०१६ नंतरच्या सर्वं बांधपत्रित अधिपरिचरिकांची विषेश लेखी परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालया समोर महाराष्ट्र राज्य कास्टराईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने काम बंद ठेवून एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

वेतन कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा तसेच १५ एप्रिल २०१५ नंतरच्या सर्व बांधपत्रित परिचारिकांची विशेष लेखी परीक्षा घेऊन त्यांना कायम करावे,४ ऑक्टोबर २०१३ ला मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, २०१७ ला झालेल्या सरळसेवा भरतीची चौकशी करण्यात यावी, संविधानाच्या कलम १७ नुसार सामान न्याय द्यावा, २० फेब्रुवारी २०१९ ला आरोग्य मंत्रालयाने सर्व बांधपत्रित परिचरिकांच्या सेवा नियमित करण्यात येतील असे लेखी दिले आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.
तसेच २२ सप्टेंबर २०१९ ला एकाच दिवशी विशेष परीक्षा घेण्यात आली. त्यात ESIS व DHS यांना सचिव पातळीवरून वेगवेगळा न्याय देण्यात आला त्याची चौकशी करण्यात यावी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांना जो न्याय देण्यात आला तोच न्याय बांधपत्रित परिचरिकांना लागू करण्यात यावा, स्थानिक नर्सेसला वाऱ्यावर सोडून केरळच्या आयात केलेल्या नर्सेसला तात्काळ परत पाठवून द्या, सहा महिन्यांचे अस्थायी आदेश रद्द करून अकरा महिन्याचे आदेश देण्यात यावेत या मागन्यांसाठी राज्यातील बांधपत्रित अधिपरिचरिकांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य कास्टराईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालया समोर एक दिवस काम बंद ठेऊन धरणें आंदोलन करण्यात येत आहेत.


त्याचाच एक भाग म्हणून मुखेड येथील बांधपत्रित अधिपरिचरिकांनी मुखेड उपजिल्हा रुग्णालयासमोर काम बंद ठेवून धरणे आंदोलन केले. यावेळी कैलास तेलंग, अस्विनी जाभाडे,रवी धुळे,मनीषा हिमगिरे,बारहाळे,लाडेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.


https://www.facebook.com/LokbharatNews/?modal=admin_todo_tour

Like and share