भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी प्रल्हाद उमाटे

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांची निवड केली असल्याची माहिती नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देशात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनतापक्षाच्यावतीने नांदेड जिधल्हयात विविध पदांंंची निवड करण्यात आली या निवडीत भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा अध्यक्ष यंाच्या निवडी केल्या गेल्या आहेत. गत अनेक वर्षापासून नांदेड जिल्हयाचे भाजपाचे प्रवक्तेपद रिक्तच होते. या पदावर भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी हिंदूवादी विचाराचे असलेले जेष्ठ पत्रकार प्रल्हाद गणपतराव उमाटे यांची भाजपाच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड केली आहे. पत्रकार प्रल्हाद उमाटे यांच्या जिल्हा भाजपाच्या प्रवक्तापदी झालेल्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.