आरोग्यासाठी पर्यावरण मोलाचे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- निसर्गाचे आणि आरोग्याचे खूप जवळचे नाते आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरणही असले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रजातीच्या झाडाचे रोप लावण्यात आले. यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्याही हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी तहसिलदार वैशाली पाटील, ए. बी. बिरादार, विधि अधिकारी आंनद माळाकोळीकर, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, वन विभागातिल वनअधिकारी, जिल्हा एमआयएस समन्वयक रुपेश झंवर, गणेश नरहिरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डुबूकवाड, अदि अधिकारी उपस्थित होते.