जमीनीचा वाद काढून सुनिल राठोड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; पोलिसात तक्रार दाखल

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी : पवन  क्यादरकुंटे 

मुखेड तालुक्यातील नानु तांडा ( वसुर ) येथील सुनिल तेजेराव राठोड यांना मागील जमीनीचा वाद काढून घरात घुसुन जीवे मारण्याचा प्रयत्न दि. 03 रोजी रात्री 7 च्या सुमारास करण्यात आला.

सुनिल राठोड हे घरी असताना त्याच्या घरी  काही लोक एकत्र येऊन तु बाहेर निघ,तुला कापुन फेकुन टाकतो,तु खुप मोठा पत्रकार झाला आहेस का ? असे म्हणत अंगावर येत हल्ला केला त्यात सुनिल राठोड यांचे भाऊ अंकुश राठोड ह जवळच असल्याने सुनिल राठोड यांच्यावर होणारा हल्ला परतुन लावला. बाहेर  आल्यावर अंगावर गाडी घालतो,राजकीय पुढा-­यांचा हात आमच्या पाठीशी आहे असे हल्ला करणा­-यांनी म्हणले असल्याचे पोलिस स्टेशन मुक्रमाबाद येथे दिलेल्या तक्रारीत सुनिल राठोड यांनी नमुद केले आहे.

सुनिल राठोड हे पत्रकार असुन बातम्यांसाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे हल्ला करणा-­यांपासुन जीवीतास धोका असुन हल्ला करणा-­या विरोधात कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी असेही यात सुनिल राठोड यांनी म्हटले आहे.