शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची पेरणी करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भागवत देवसरकर यांचे आवाहन

नांदेड नांदेड जिल्हा

दत्ता पाटील मालेगावे 

शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीमध्ये खरीप पिकाची पेरणी किंवा लागवड करताना आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच जमिनीमध्ये पिकाची पेरणी माती परीक्षण केंद्राच्या शिफारशीनुसार पिकास आवश्यक खताच्या मात्रा देऊन आपल्या पिकाचे उत्पन्न वाढावावे,याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच खरीप हंगामाची पेरणी करावी असे आवाहन लींगापुर येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना जमिनीतील माती व पाणी परीक्षण करण्याची सुविधासाठी लींगापुर येथे अद्यावत सर्व सुविधायुक्त राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे,या माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील मातीची व पाण्याची तपासणी करूनच आपल्या जमिनी मध्ये कोणत्या अन्नद्रव्याची मुलद्रव्याची व नत्र स्फुरद पालाश याची किती कमतरता आहे हे माहिती करूनच आपल्या पिकाची पेरणी करावी,जमिनीच्या मातीचे नमुने तपासणी केली

 

तर या पिकांना व्यवस्थित खताच्या मात्रा देता येईल माती परीक्षण केंद्र यांनी केलेल्या शिफारशीनुसार खताच्या मात्रा दिल्या तर उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल व उत्पन्न वाढीस निश्चित मदत होईल,शेतकरी बांधवांना सवलतीच्या दरामध्ये मातीचे परीक्षण करून त्यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल या संधीचा फायदा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी घ्यावा असे आवाहनही भागवत देवसरकर केले आहे.