शेतकऱ्यांकडून “ना हरकत प्रमाणपत्र ” न घेता सरसकट कर्ज द्या – शिवशंकर पाटील कलबंरकर

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  : ज्ञानेश्वर  डोईजड

शेतकऱ्यांची कर्जासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र घेऊ नये’ व कर्जमाफ झालेल्या,कर्जमाफ न झालेल्या,नवीन कर्ज हवे असलेल्या अशा सर्वच शेतकऱ्यांना पिककर्ज द्यावे  अशी मागणी निवेदनाव्दारे तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे शिवशंकर पाटील कलबंरकर यांनी दि  ०२ रोजी केली आहे.

            आवश्यकता नसलेल्या कागदपत्राच्या अटी लावून शेतकऱ्यांची अडवणूक बँका  करत असतात. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने सूचना देऊन  हि शेतकऱ्यांना पिककर्जासाठी इतर बँकेकडून ‘ना हरकत प्रमाणापत्र’ घेऊन  या  अशी  बँका मागणी  करत आहेत .
         त्यामुळे  पिककर्ज वाटपाच्या बाबतीत हि अट रद्द करण्याचे सर्वच बँकांना आदेश  द्यावा व  सरसकट  शेतकऱ्यांना कर्ज  द्यावे अशी निवेदनाद्वारे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे मागणी  केली आहे.