नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मिळाली गती…..

देगलूर नांदेड जिल्हा

देगलुर : राजु राहेरकर

तालुक्यातील भक्तापुर, नागराळ या दोन गावांना जोडणारा रस्ता देगलुर शहराच्या वार्ड क्र. १२ मधुन जातो तेव्हा सदरील रस्ता हा मागील अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता, तसा सदरील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो पण रस्त्याची दोन किमी चे अंतर हे देगलुर नगर परिषद हद्दीत येतो व वार्ड क्रमांक १२ मधुनच पुढे जातो तेव्हा सदरील रस्त्यावर शहरातील नागरीकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने शहरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.

 

म्हणून सदरील वार्ड क्र १२ चे नगरसेवक शैलेश उल्लेवार यांनी संबंधित विभागास वेळोवेळी नागरिकांना होत असलेल्या त्रासा बाबत समस्या मांडुन मान्सूनपूर्व अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरळीत करुन घेऊन पावसाळ्यात रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून जनतेची सुटका केली……