मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील तीन  दुकानाला भीषण आग ;            ४ लाख ५० हजाराचे  नुकसान

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  :  ज्ञानेश्वर डोईजड 
मुखेड तालुक्यातील सावरगाव (पी) येथील मुखेड जांब रोड वरील तीन दुकानाला दि ३१ मे  रोजीच्या  रात्री लागलेल्या भीषण आगीत ४ लाख ५० हजार रूपायचे नुकसान झाले .
        या आगीत ईलेक्ट्रिक, मोबाइल शॉप व हॉटेल जळून खाक झाली असून  एका दुकानाचे किरकोळ नुकसान झाले आहे .आगीने उग्ररूप घेतले  असता  गावकऱ्यांनी पाणी टाकून  आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर अग्नीशामक दलाची गाडी  थोड्यावेळात दाखल झाल्यानंतर संपूर्ण आग आटोक्यात आली. या  आगीत  कोणतीही जीवितहानी झालेली  नाही.
       आग लागलेली कळताच  मुखेड पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दि .१ जून रोजी दुपारी  १२ वाजता तलाठी  एम.एस.खिलारे, ग्रामसेवक ए.के. बिरू , यानी पंचनामा केला असून या प्रसंगी सरपंच संगमेश्वर देवकत्ते, माजी सरपंच कृष्णा कांबळे,नारायण चमकुरे,दत्ता पाटील ,मनोज काबळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.