शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ठळक घडामोडी महाराष्ट्र

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये एमएसएमई क्षेत्राची बिघडलेली परिस्थिती पुन्हा सुधारित करण्यासाठी 20 हजार कोटींच्या कर्जाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 14 पिकांना 50 ते 83 टक्के अधिक भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देतांना असं म्हंटल आहे की शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ही सर्वात मोठी घोषणा आहे. दरम्यान कोणकोणत्या पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ झाली आहे. त्यावर एक नजर टाकूया

मका पिकाच्या आधारभूत किंमतीत 53 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

तर तूर आणि मुग पिकांच्या किंमतीत 58 टक्के वाढ करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त 14 पिके अशी आहे ज्यांच्या किंमतीत शेतकऱ्यांना 83 टक्क्यांची वाढ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना केलेल्या खर्चाच्या व्यतिरिक्त 50 ते 60 टक्के अधिक उत्पन्न मिळणार

 

तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे, त्यांना कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी वाढवून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत या रकमेची परतफेड करता येणार आहे. शेतकऱ्यांनी कोरोना कालावधीत केलेल्या उत्पादनापैकी 360 लाख मेट्रिक टन गहू आणि 16.07. लाख मेट्रिक टन डाळ सरकारनं खरेदी केल्याचंही तोमर यांनी स्पष्ट केलं.