लॉकडाऊनमध्ये डॉ. सुभेदार दांम्पत्याने केली दोन हजार रुग्णांवर उपचार        ग्रामीण भागातील बालकांसह गर्भवती महिलांना दिलासा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

राज्यात कोरोनाचे संकट बिकट असता अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवत कोरोनाला शरण गेले पण याला अपवाद राहता मुखेड येथील प्रसिध्द बालरोतगज्ञ डॉ. व्यंकट सुभेदार व रुाीरोगतज्ञ डॉ. माधवी व्यंकट सुभेदार या दांम्पत्याने  गर्भवती महिला, बालकांवर उपचार करत तब्बल दोन हजार रुग्णांवर उपचार जीवाची पर्वा न करता केली.

त्यांच्या रुग्णालयात बाह्रविभाग नियमित ठेवून मार्च महिन्यात ६५० एप्रिल महिन्यात ६०० व  मे महिन्यात ७५० असे  एकूण दोन हजार रुग्णावर यशस्वी उपचार करत  गरोदर माता, बालकांचे आजार,सोनोग्राफी अशा विविध सुविधा कोरोना काळात अत्यल्प दरात देत एक सामाजिक संदेश दिला आहे.

डॉ. व्यंकट सुभेदार हे आय.एम.ए.चे मुखेड चे अध्यक्ष तर बाजार समिती चे उपसभापती आहेत तर डॉ. माधवी व्यंकट भोसले हया माजी नगरसेवक असून त्या शिक्षण संस्थेचे मुख्य संचालकही आहेत. सामाजिक काम ची आवड असलेले हे डॉक्टर्स दाम्पत्याने कोरोनाच्या भीतीनेे गर्भित झालेल्या नागरिकांना दिलासा देत रुग्णात आत्मविश्वास जागृत करुन सेवा केली हे विशेष.

शहरात अनेक रुग्णालये कोरोनाच्या भितीने बंद त्यात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्स यांना कोरोनाची बाधा अशी अवघड परिस्थिती असताना अशा संकट काळात अविरत सेवा डॉ. सुभेदार दाम्पत्याने दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रात्री अपरात्री आलेल्या रुग्णावर तितक्याच ऊर्जेने उपचार या दाम्पत्याने केला असुन गर्भवती महिलांसाठी तालुक्यात प्रसिध्द रुग्णालय असल्याने अनेक महिलांसाठी वरदानच म्हणावे लागेल.


    कोरोनाच्या संकट काळात अविरत रुग्णांना सेवा दिली तर रात्री – अपरात्री रुग्ण येत असे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना या सेवेचा फायदा झाला असुन सोनोग्राफी, गभर्वती महिला, लहाण बालके अशा विविध रुग्णावर कोरोनाच्या संकट काळात यशस्वी उपचार केल्याचे आनंद वाटत आहे.

डॉ. व्यंकट सुभेदार
बालरोग तज्ञ, मुखेड