अजुन किती दिवस शेतकऱ्यांचा अंत पाहणार आहोत मँनेजर साहेब आता तरी दुष्काळी अनुदान जलद गतीने वाटप करा

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील मध्यवर्ती बँके मध्ये शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान जमा झालेले आहे. पण संबंधित मॅनेजर हे अनुदान वाटपास विलंब करीत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेला संपर्क केला असता शेतकऱ्यांना आठ दिवसांत वाटप सुरू होणार आहे.

अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. सततच्या दुष्काळाने व देशांमध्ये कोरोना महामारीने देशासह राज्यात सुध्दा हाहाकार माजला आहे. संपुर्ण देशात लाँकडाऊन आहे. लाँकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना भाजीपाला, टरबुज पिकाला मोठ्या प्रमाणावर झटका बसला आहे.अगोदरच शेतकऱ्यांना अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातुनच शेतकरी कसा बसा बाहेर आला असता, मध्येच कोरोना सारख्या महामारीने शेतकऱ्यांचे लाँकडाऊनच्या काळात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी सुद्धा या बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही घाम फुटतचं नाही.

तीन महिन्यापूर्वी मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान जमा झाले असताना सुद्धा सर्व शाखेतील दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. पण मुक्रमाबाद शाखेतील दुष्काळी अनुदान वाटपाचे कामकाज संथगतीने चालू आहे.शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून दिलेला अनुदान असतानाही आजपर्यंत वाटप करण्यात आले नाही. पेरण्या जवळ आलेल्या आहेत तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसे अद्याप ही मिळाले नाही. शासन दुष्काळी अनुदान देण्यासाठी तयार आहे पण बँकेचे कर्मचारी हलगर्जीपणा करत आहेत.शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळी अनुदान वाटप केले तर पैसे शेतकऱ्यांच्या कामी येतील. लाँकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बि-बियाणे घेण्यासाठी जवळ पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या उंबरठ्यावर कर्जासाठी जावे लागेल. मुक्रमाबाद येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 28 गावाचे दुष्काळ वाटप आहे.आज जुन महिना उजाडला आहे.तरी त्यांनी 28 पैकी 7 ते 8 गावाचे वाटप झाले आहे. 20 गावे वाटपाचे शिल्लक आहेत.आणि अशीच वाटपाची बँकेकडून गती राहिली तर संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला हा ही वर्ष निघुन जातो की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


या बँकेत शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्यांचे दोन दोन खाते काढुन शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवत आहेत. या संदर्भात बँकेच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे रीतसर तक्रार करून सुध्दा बँक प्रशासन सुधारत नाही. पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना येणारी रक्कमेत ही घोळ करीत आहेत. कोरोणा महामारीने शेतकरी आर्थिक बाजुने हतबल झाला आहे व यातच आता पेरणीची लगबग सुरु होत आहे. तरी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान जलद गतीने वाटप करावे अन्यथा गाठ प्रहारशी आहे
– मन्मथ खंकरे (प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख मुखेड)