मुखेडात दोन कोरोना रुग्ण आढळले ; २४ अहवाल निगेटिव्ह..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

 

मुखेड : संदीप पिल्लेवाड

मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील दोन कोरोना रुग्ण आढळले  असून  २४ अहवाल निगेटिव्ह  आल्याची माहिती कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. नागेश लखमावार यांनी दिली.

हे दोन रुग्ण मुंबईहुन गावाकडे आले होते. दि. दि. 27 मुखेड येथील कोव्हिड सेंटर येथे ते दाखल झाले होते. दि. 28 रोजी नांदेडच्या लॅब कडे स्वॅब घेऊन नांदेड कडे पाठविण्यात आला होता. दि. 31 रोजी दुपारी त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला असुन त्यांचा मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.

भेंडेगाव येथील दोन रुग्णाचे वय 27 व 32 असुन दोन्ही पुरुष आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याचे काम चालु असुन एका रुग्णाच्या परिवारातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे तर त्या दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर असुन त्यांच्यावर मुखेड येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार चालु आहेत.