मुखेडच्या डॉक्टर्स व नर्सच्या संपर्कातील २४ अहवाल सात दिवसापासुन प्रलंबित !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्स यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २४ जनांचे अहवाल नांदेड येथील लॅबला पाठविण्यात आले होते मागील सात दिवसापासुन त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याने त्यांच्या कुटूंबात व संपर्कातील व्यक्तींच्या मनात धाकधुक निर्माण झालेली आहे. मुखेड मधील एकुण ५१ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आहे त्यात २४ अहवाल डॉक्टर्स व नर्स यांच्या संपर्कातील आहे.

डॉक्टर व नर्स यांच्या संपर्कातील अहवाल आले नसल्याने नागरीकांत उलटसुलट चर्चा होत आहे. याबाबत स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिका­ऱ्याना विचारले असता त्यांनी सुध्दा वरीष्ठ स्तरावर वेळोवेळी अहवाल देण्याची विनंती केल्याचे सांगितले पण आठ दिवसापासुन अहवाल प्रलंबित कसे ? हा प्रश्न नागरीकांत विचारला जात आहे.


याबाबत उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांना विचारले असता, नांदेड मध्ये तीन जिल्हयाचे अहवाल येत असतात त्यामुळे बॅचेस खाली वरी झाले असतील त्यामुळे उदया (दि. 31 रोजी ) अहवाल नक्कीच येतील असे सांगितले.