नाफेड कापुस खरेदी केंद्राच्या, ग्रेडरला घातला घेराव…..

ठळक घडामोडी देगलूर

देगलुर : राजु राहेरकर

मागील काही दिवसांपासून धर्माबाद येथील नाफेडच्या कापुस खरेदी केंद्रावर देगलुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापुस खरेदी चालू आहे त्या दरम्यान त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे तक्रारी सोशल मिडीयाव्दारे बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हा संपूर्ण नांदेड जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असलेले देगलुर शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांनी तात्काळ धर्माबाद येथे जावुन नाफेड कापुस खरेदी केंद्रावर तालुक्यातील कापुस विक्री साठी गेलेल्या शेतकऱ्यांची विचार पुस करुन कापुस खरेदी केंद्राच्या ग्रेडरला घेराव घातला व त्यांना तात्काळ धर्माबाद येथुन हटवुन त्या ठिकाणी दुसरा ग्रेडर नेमवावा अशी नाफेड च्या वरिष्ठ अधिकारी यांना फोन व्दारे सुचना केल्या तेव्हा त्यांच्या सोबत धर्माबाद शिवसेना तालुका प्रमुख गणेश गिरी महाराज व शहर प्रमुख अनिल कमलाकर व देगलुर तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकरी रामचंद्र पाटील गवंडगावकर, सुर्यकांत पत्तेवार, मारोती देशमुख आदीसह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते…..