अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभेच्या मार्गदर्शक पदी श्री ष.ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलूरकर यांची निवड

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर  : राजू  राहेरकर

झूमअॅप द्वारे घेण्यात आलेल्या कॉन्फरन्स मीटिंगीमध्ये अनेक ज्येष्ठ शिवाचार्यांचा सहभाग
महाराष्ट्रातील समस्त शिवाचार्य यांच्यावतीने आज झूम व्हिडीओ कॉन्फरंस मीटिंग आयोजित केली होती या मिटिंग मध्ये महाराष्ट्र राज्यातील तमाम शिवाचार्य वीरशैव लिंगायत मठाधिपती यांची महासभा (संघटना) स्थापन करण्यात आली. या व्हिडीओ कॉन्फरंस मिटींगला अनेक ज्येष्ठ शिवाचार्य यांचे मार्गदर्शन लाभले मिटिंग मध्ये स्थापन केलेल्या महासभेचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावे याच्यासाठी सर्वांच्या विचाराणे ही महासभा स्थापन केली आहे.

 

अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा हे नाव सर्वानुमते घोषित करण्यात आले. सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि पुढील कार्यासाठी पदाधिकार्यांची निवड संपन्न झाली या महासभेचे उध्दीष्ट राज्यातील तमाम वीरशैव लिंगायत मठ संस्थाना मार्फत सामाजीक धार्मिक कार्याला गती देने, विद्यार्थी व गरजुंना शक्य ते मदत करने धार्मिक पाठशाळेची स्थापना तसेच राज्यातील तमाम शिवाचार्य महाराजांना संघटीत ठेवन्याचे कार्य या महासभेच्या माध्यमातुन केले जाईल.तसेच मठाचे संरक्षन व काही अडीअडचनीवर मात करण्यासाठी हि संघटना पुढाकार घेऊन शिवाचार्याप्रती होनार्या अन्यायाविरूध्द ठामपने पुढाकार घेईल व धर्मसभेचे वेळोवेळी आयोजन करून धार्मिक आध्यात्मिक विचारमंथन केले जाईल.

 

असे या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. हजारो वर्षांपासून सर्व ऋषी मुनी देवदेवता आणि आखाडे व मठमंदीरांचे गुरुत्व असलेले वीरमाहेश्वर जंगम शिवाचार्यांची जगद्विख्यात परंपरा कश्मीर नेपाळ ते रामेश्वर श्रीलंकेपर्यंत व्यापलेली असून सर्वत्र जंगममठ जंगमवाडीमठ ते विविध मठ रूपात अविरतपणे चालू आहेत.शेकडो पिढ्यांचा इतिहास असलेल्या या वीरशैव लिंगायत संप्रदाय शिवाचार्य मठाच्या संस्था म़ंडळे परिषद व संघटना अखिल भारतीय म्हैसूर मुंबई हैद्राबाद तेलंगणा आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा प्रांत व कोकण प.महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश अशाप्रकारे विविध विभागात आपापल्या परीने कार्यरत आहेत परंतू संपूर्ण महाराष्ट्रातील शिवाचार्य एकत्र करून त्याची एक नूतन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली

नूतन पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे आहेत
अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा
गौरवाध्यक्ष
खा डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य
मार्गदर्शक
सिद्धलिंग शिवाचार्य साखरखेर्डा
मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूर
शिवयोगी शिवाचार्य मैशाळ
श्री शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलूर
पण्डिताराध्य शिवाचार्य वडांगळी
राजेश्वर शिवाचार्य मेहकर
सिद्धलिंग शिवाचार्य शिखर शिंगणापुर
अध्यक्ष
डॉ विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधाम
उपाध्यक्ष
नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर
रेणुक शिवाचार्य मंद्रूप
शंभोलिंग शिवाचार्य उदगीर
कार्याध्यक्ष
विरुपाक्ष शिवाचार्य मुखेड
सचिव
महादेव शिवाचार्य वाई
सहसचिव
सिद्धदयाळ शिवाचार्य बेटमोगरा
शिवानंद शिवाचार्य वाळवा
प्रवक्ता
दिगंबर शिवाचार्य वसमत
सहप्रवक्ता
अमृतेश्वर शिवाचार्य जिंतूर
कोषाध्यक्ष
श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर
सहकोषाध्यक्ष
डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य होटगी
संपर्क प्रमुख
शंभूलिंग शिवाचार्य अम्बाजोगाई
राचलिंग शिवाचार्य परण्डकर
काशीनाथ शिवाचार्य पाथरी
गुरुपादेश्वर शिवाचार्य गिरगाव
आज सर्वांची निवड झाली आहे.
महाराष्ट्राती ल सर्व शिवाचार्य या मिटींगला उपस्थित होते.