मुखेडकरांसाठी आनंदाची बातमी “ते” दोन रुग्ण कोरोनामुक्त….

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील रावणकोळा येथील दि. ३० रोजी एक  महिला ३५ वर्ष व तीचा मुलगा १४ वर्षाचा असे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेने रावणकोळा येथे सोडण्यात आले असल्याचे कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. नागेश लखमावार यांनी सांगितले.

३५ वर्षीय महिलेने व १४  वर्षाच्या  लहाण मुलाने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सात दिवसाच्या क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना आता कोणतीही लक्षणे नाहीत तर एकुण ३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मुखेडकरांसाठी आनंदाची बातमी असुन उर्वरीत दोन रुग्णांना सुध्दा कोणतीच लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनात  काम  करणाऱ्या  डॉक्टर  व प्रशासनाचे सर्वत्र  कौतुक  होत  आहे .