कोव्हिड 19 च्या प्रतिबंधासाठी आयुष संचालनालयाने सुचविले उपाय

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

 

नांदेड :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या आजारापासून बचावासाठी आयुष संचालनालयाने नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. यात आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमियोपॅथी या उपचार पद्धतीमध्ये रोगप्रतिकार क्षमता वर्धक व रोगप्रतिकार औषधी सुचविल्या आहेत.

कोविड- 19 हा आजार मुख्यत: वयोवृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या व्यक्ती तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूल असणाऱ्या व्यक्तीसाठी अधिक घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांची व सामान्य नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यानुसार आयुर्वेदातील संशमनी वटी, आयुष काढा, होमियोपॅथी मधील आर्सेनिक अल्बम-30, युनानी मधील वेहिदाना उन्नाव, सॅपिस्टन यांचा काढा तसेच सिद्ध चिकित्सा पद्धतीतील निळेम्बु कुडीनीर काढा याचा वापर करावा. योग चिकित्सेमधील प्राणायाम, सुर्यनमस्कार व ध्यान इत्यादीचा अवलंब करावा. वर उल्लेख केलेल्या औषधांचा वापर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसारच करावा. तोंडाला मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, खोकलतांना किंवा शिंकतांना तोंडावर रुमाल लावणे आदी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेद उपचारात संशमनी वटी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा पंधरा दिवस, आयुष काढा 40 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. होमिओपॅथी उपचार Arsenicum Album 30 पाच गोळ्या सकाळी उपाशी पोटी तीन दिवस आणि एका महिन्यानंतर पुन्हा तीन दिवस. सिद्ध उपचार निळवेम्बु कुडीनिर काढा 60 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. युनानी : बेहीदाना 3 ग्रॅम उन्नाब 5 नग सॅपीस्टन 1 नग 40 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. योग- प्रात: काळी 5 ते 6 वा. अनुलोम, विलोम, भस्म्रिका, भ्रामरी व कपाल भारती, सुर्यनमस्कार तसेच ध्यान दररोजन नित्य नियमाने करावे, असे आवाहन शासकीय आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी केले आहे.