बाराहाळी येथे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टन्ससिंग चा उडाला फज्जा…

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : रमेश  राठोड

दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बाराहाळी येथे सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाला आहे .

बाराहाळी येथे दुष्काळी चे पैसे उचलण्याची तुफान गर्दी होत आहे ,दररोज अशीच शेकडो लोक वेगवेगळ्या गावाचे येत असून त्यामुळेच कोरोना चे संसर्ग पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, अगोदरच मुखेड मध्ये कोरोना चे रुग्ण आहेत, तरी देखिल लोकांना यांचे गांभीर्य सध्या तरी अजिबात दिसून येत नाही.

 

याच परिसरात यादीतील नाव बगण्यास दलालांनी शेतकऱ्यांना लुटत आहेत विश्वनाथ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मध्ये औषध गोळ्या न देता शेतकरी कडून पैसे उकळून , xerox एका झेरॉक्स दहा रुपये आणि दुष्काळी तील यादीतील नावे बघण्यासाठी वीस रुपये घेत आहे. भर उन्हाळ्यात दिवसभर लोकांना रांगेत याचं पध्दतीने थांबावे लागत आहे, तरी बँकेत बँकेत एखादं कोउंटर वाढ करून शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावे अशी नागरिकांनी  मागणी  केली  आहे .