नागठाण येथील निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या हत्या करणाऱ्या त्या नराधमास फाशी द्या- हेमंत खंकरे

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  क्यादरकुंटे

नांदेड जिल्ह्यातील नागठाणा येथे झालेल्या निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या हत्याची घटनेचा महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे व तसेच विविध सामाजिक संघटनेतर्फे या घटनेची सखोल चौकशी करून या नराधमास कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर मुखेड तालुक्यातील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष हेमंत खंकरे यांनी या नराधमांना तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली

उमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागठाणा गावात मठाधिपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांची रात्रीच्या सुमारास हल्ला करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने संबंध जिल्हाभरात राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेने विविध स्तरातून निषेध व्यक्त करत आहेत याच अनुशंगाने शिवाचार्य महाराज यांच्या आरोपीस तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी बसव ब्रिगेड जिल्हाउपअध्यक्ष तथामुखेड भाजपाचे तालुका उपाध्यक्ष हेमंत खंकरे यांनी गृहमंत्र्याकडे केली आहे