मयत झाल्यानंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; मुखेड मधील त्या महिलेचा नांदेड येथे अंत्यसंस्कार !संपर्कातील वाहनचालकासह १८ लोकांना ठेवले कोव्हिड केअर सेंटरमध्ये

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :संदीप  पिल्लेवाड

     शहरातील कोळी गल्लीतील ४० वर्षीय महीलेचा कोरोना तपासणीचा अहवाल नांदेड येथुन दि. २९ रोजी सकाळी पॉझीटीव्ह आला आहे. त्या महिलेची मृत्युनंतर तपासणी करण्यात आली असता अहवाल पॉझीटिव्ह आल्याने संपर्कातील १८ लोकांना प्रशासनाने ताब्यात घेतले असुन त्यांचे लवकरच स्वॅब टेस्ट (कोरोना तपासणी) घेण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ती महिला मुखेडच्या खाजगी दवाखान्यात साफ सफाईचे काम करत होती. चार -पाच दिवसापुर्वी त्या महीलेला पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे त्या महीलेला दि. २७ रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण दि. २८ रोजी सायंकाळच्या दरम्यान त्या महीलेचा मृत्यु झाला. त्या महीलेला  श्वास  घेण्याचा त्रास होत असल्याने मृत्युनंतर महिलेेची कोरोना तपासणी करण्यात आली व तारीख २९ रोजी सकाळी त्या महीलेचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला. कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ  नये म्हणुन त्या महीलेचा मृतदेह मुखेडला न आणता त्या महिलेवर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार  असल्याचे  आरोग्य  विभागाच्या  वतीने  सांगण्यात आले .

त्या  महिलेच्या कोरोना पॉझिटिव्हची  माहीती कळताच मुखेड प्रशासन तात्काळ कामाला लागले व तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील कोळी गल्ली परिसर सील करण्यात आला असुन त्या महीलेच्या संपर्कातील नांदेडला घेऊन गेलेल्या स्विफ्ट कारच्या वाहन चालकासह १८ लोकांना प्रशासनाने कोव्हिड केअर सेंटरमध्ये देखरेखीखाली  ठेवण्यात आले आहे.


शहरातील कोळी गल्लीच्या महीलेचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे कळताच तो परिसर सिल करण्यात आला आहे. व त्या महिलेच्या संपर्कातील १८ लोकांना ताब्यात घेउन तपासणीसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. लवकरच तो परिसर नगर परिषदेच्या वतीने निर्जुंतुकीकरण करण्यात येणार आहे.

           त्र्यंबक कांबळे
    मुख्याधिकारी, नगर परिषद, मुखेड


मुखेड मधील त्या चार रुग्णांची तब्येत स्थिर

       मुखेडच्या कोव्हिड रुग्णलयात एकुण पाच रुग्ण होते त्यापैकी दि. २८ रोजी एकाला सुट्टी देण्यात आली. तर एक वैद्यकिय अधिकारी, एक नर्स व दोन रावणकोळा येथील रुग्ण असे चार कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.