मुखेडातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा ; त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह रुग्णवाहिकेने सोडण्यात आले त्याच्या मुळ गावी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड
मुखेड मध्ये नायगांव तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवाशी असलेला रुग्ण दि. २० रोजी आढळला होता. यामुळे संपुर्ण मुखेडात खळबळ उडाली होती पण तो रुग्ण दि. २८ रोजी ठणठणीत बरा झाल्या असुन आरोग्य विभागाच्या वतीन हार घालुन त्यास मुळ गावी पाठविण्यात आले.

हा रुग्ण दि. १३ मे रोजी दहीसर येथुन टेंपोने प्रवास करुन शिरुर ताजबंद या गावी उरतला असता कारने लिफ्ट घेऊन मुखेड गाठले होते तर पांडुर्णी गावातील शेतात दिवस वास्तव्य केले होते. दि. १८ रोजी स्वॅब घेऊन लॅबला पाठविण्यात आले. दि. २० रोजी त्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला होता.

त्याच्या संपर्कातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले असुन त्यास त्याच्या मुळ गावी टेंभुर्णी येथे रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले त्यास सात दिवस क्वारंटाईन राहण्यात सांगितले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

           या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आणण्यासाठी डॉ. एस.के. टांकसाळे व परिचारीका प्रतिभा हाळदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. रुग्णास सुट्टी देताना नोडल ऑफिसर डॉ. नागेश लखमावार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील,डॉ. एस.के. टांकसाळे व परिचारीका प्रतिभा हाळदेकर यांची उपस्थिती होती.

सदर रुग्णाचा स्वॅब घेऊन पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे हे कळले पण स्वॅब न घेता रुग्ण निगेटिव्ह घोषित करणे हे कितपत योग्य असे नागरीकांत सवाल उपस्थित केला जात आहे. पण आ.सी.एम.आर. च्या निर्देशानुसार रुग्णास सुट्टी देण्यात आली असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

…………………………… …………………….
रुग्णाची तब्येत स्थिर होती रुग्णास दहा दिवस झाल्याने व त्यास कोणतीही लक्षण आढळली नसल्याने त्यास वैद्यकिय सल्यानुसार त्यास सुट्टी देण्यात आली असुन त्यास सात दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे असे नोडल ऑफिसर डॉ. नागेश लखमावार यांनी सांगितले.