केतन चौधरी यांच्या वतीने नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० एक लाख गोळ्याचे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

शहरातील तग लाईन येथील रहिवाशी कैलास सावकार चौधरी यांचे सुपुत्र केतन चौधरी मातृभुमीची जान ठेवुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सेवा देणा-या नगर परिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार, बँक कर्मचारी, महामंडळ कर्मचारी, तग लाईन, राम मंदिर गल्ली, मित्र परिवार व पत्रकार यांना १०० गोळ्याची एक डब्बी असे १००० डब्या म्हणजेच १ लाख रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे वाटप करण्यात आले.

आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप संस्था आणि तसेच राजकारण्यांकडून केले जात आहे. कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या केतन चौधरी यांनी प्रथमत: औरंगाबाद येथे वाटप केले त्यानंतर त्यांनी आपली मातृभुमी व जन्मभुमी असलेल्या मुखेड गावातील नागरिकांना देण्याचे ठरवले व त्यांनी तब्बल १ लाख गोळ्याचे वाटप मुखेड शहरात व तालुक्यात केले.
केतन कैलास चौधरी शिक्षण डी.फार्मसी यांनी ५ महीन्यापुर्वी औरंगाबाद येथे नवीन मेडीकल सुरु केले व गरिबीची जान ठेवुन आपण समाजासाचे काहीतरी देणे लागतो व समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला हवे या उद्देशाने मागील ५ महीन्यांत कमविलेली पुंजी त्यांनी समाजउपयोगी आणली आणि कोरोनाच्या पार्श्वभुमिवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेली भारत सरकार मान्य अर्सेनिक अल्बम ३० या तब्बल १ लाख गोळ्या त्यांनी स्व:तच्या कमाईचे पैसे खर्च करुन मुखेड येथे आणुन त्यांनी वाटप केले. या स्तुत्य उपक्रमामुळे केतन चौधरी यांचे सर्वच स्तरातुन सोशल मिडीयाव्दारे कौतुक करण्यात येत आहे.


माझे नाव केतन कैलास चौधरी माझ्या वडीलांचे किराणा दुकान आहे. मी गरीब परिस्थितीतुन डि.फार्मसी पर्यंतचे शिक्षण घेतलो आहे. व नव्यानेच औरंगाबाद येथे मेडीकल शाॅप चालु केले आहे. कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिक घरात बसुन आहेत व कोरोनाचा प्रतिबंध म्हणुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकार मान्य अर्सेनिक अल्बम ३० या १ लाख गोळ्याचे वाटप मी नविन व्यवसायातुन स्व:त कमविलेल्या पैश्यातुन केले आहे व कोरोना संपेपर्यंत करणार आहे. या गोळ्या गरिबांना घेणे शक्य नाही तरी मुखेड शहरातील दानशूर व्यक्तीनी या गोळ्यांचे वाटप करुन जनतेची सेवा करावी.
— केतन कैलास चौधरी