कर्तृव्यात कसुर केल्याप्रकरणी तीन अधिकारी,दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस

नांदेड जिल्हा मुखेड

सतत गैरहजर राहणे व उपाययोजने सबंधी निष्काळजिपणा भोवले

मुखेड : संदीप  पिल्लेवाड 

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजने संबधी मुखेड तालुक्यातील डोरनाळी या गावी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व तेथिल कार्यरत कर्मचारी मुख्यालयी न रहाता सतत गैरहजर राहणे व गावात उपाययोजना बाबतीत कोणतेच काम वेळेवर करत नसल्याची लेखी तक्रार तहसिलदार यांच्याकडे योगेश पाटिल शिंदे यांनी दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी तेथे नियत्रंण ठेवण्यासाठी नेमणुक करण्यात आलेले तीन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना कामात निष्काळजीपणा व कर्तृव्यात कसुर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नाेटीस बजावली होती.

या कारवाईमुळे सातत्याने गैरहजर रहात असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सर्वत्र वाढतच असुन काेराेना विषाणूने थेट मुखेड तालुक्यात शिरकाव केले असतानाही अनेक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून येत आहे.तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी व बाहेरच्या शहरातुन गावात येणा-या नागरिकांचे नावे नोंदणी करुन घेणे, गावामध्ये सर्व्हे करणे व उपाययोजना संदर्भातील कार्य जबाबदारीने पार पाडण्यासाठी गावनिहाय समीती व नव्याने स्थापण करण्याता अालेल्या अन्टी कोरोना कवच टास्क फोर्स समीतीच्या माध्यमातुन कर्मचा-यांची नेमणुक करण्यात अाली आणी त्यांच्यावर नियत्रंण ठेवण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात अाली मात्र निवड करण्यात आलेले बा-हाळी सर्कलचे ग्राम विस्तार अधिकारी गर्जे , मंडळ अधिकारी गडमवाड तसेच डोरनाळी ग्रामपंचायतीसाठी प्रशासक म्हणुन नियुक्ती केलेले कृषी विस्तारा अधिकारी कासार यांनी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण तर सोडाच लाॅकडाऊन लागु झाल्यापासुन दोन महिण्याच्या काळात एकवेळा सुद्धा भेट दिली नाही त्याचबरोबर समितीतील अध्यक्ष तलाठी, ग्रामसेवक कृषीसहाय्यक हे कर्मचारी कोरोनाची एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील मुख्यालयी न रहाता प्रतिबंधात्मक उपायोजनेच्या कामात निष्काळजिपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे व सतत गैरहजर रहात असल्याचे तक्रारी द्वारे निदर्शनास आल्याप्रकरणी तालुका आपती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार यांनी कर्तृव्यात कसुर करणा-या त्या अधिकारी कर्मचा-याना कारणे दाखवा नोटिस बजावली आहेत यासंदर्भात तात्काळ खुलासा सादर करावा अन्यथा साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.


सर्वत्र थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने थेट मुखेड शहरासह ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडले असतानाही डोरनाळी गावचे तल्लाठी स्वामी यांना दि. ७ मे पासुन सतत गैरहजर रहात असुन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी माझ्यासह गावातील नागरिकांकडून होत आहे.

योगेश पाटील डोरनाळीकरhttps://www.facebook.com/LokbharatNews/?modal=admin_todo_tour

Like this Page