तलवारे दाम्पंत्याचा कोरोना संकट काळात स्त्युत्य उपक्रम            लग्नाच्या वाढदिवशी केली अकरा हजार रुपयांची मदत

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

आज काल लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सोशल मिडीयावर खुप होताना दिसत आहे पण कोरोनाच्या संकट काळात लग्नाच्या वाढदिवशी प्रशासनाला अकरा हजार रुपयांची मदत मुखेड शहरातील दाम्पंत्य बालाजी तलवारे व सौ. पुनम बालाजी तलवारे यांनी केली .

कोरोनाच्या संकट काळात अनेकावर उपासमारीची वेळ आली आहे. आपण शांतपणे झोपू शकलो तरी अनेक गोरगरीब , वंचित नागरीकांना त्यांच्या कुटुंबास खायला मिळत नसल्याने झोप येत नाही. अशा संकट काळात गरीबांना मदत म्हणुन तलवारे कुटुंबाने हि  मदत  केली .

यावेळी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम व तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे धनादेश तलवारे दाम्पंत्याने सुपुर्द केला .