नांदेड जिल्ह्यात आर्सेनिक अल्बम 30 चे औषध,गोळ्या मोफत वितरण करा-महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : नांदेड जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावागावात , ग्रामीण भागात सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनीही मोफत आर्सेनिक अल्बम 30 औषध वितरणासाठी पुढाकार घ्यावा व जिल्हा प्रशासनाने मोफत औषध व गोळ्या संबंध जिल्ह्यात मोफत वाटप कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रत्येक राज्याला आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वापरण्याचे दिले आदेश. अनेक राज्यात,अनेक जिल्ह्यात फ्री मध्ये वाटले जात आहे ‘आर्सेनिक अल्बम 30’
कोणतेही घातक परिणाम(साइड इफेक्ट) नसल्याने सर्वांसाठी उपयुक्त असल्याने करोनासाठी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वरदान ठरणार आहे.

ज्यांना करोना नाही अश्या व्यक्तिसाठीच हे औषध असल्याने अश्या व्यक्तिंसाठी हे औषध ठरणार रामबाण उपाय. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ति वाढवुन करोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस द्यायला सुरवात केली आहे. याचा लाभ सर्वसामान्य बरोबरच जेष्ठ नागरिक आणि कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्यांना अधिक होणार आहे. सध्या पालिकेच्या अनेक विभागात याची सुरवात झाली आहे. हळू हळू मुंबईतील सर्व विभागात याचे वितरण केले जाणार आहे. करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरला असल्याने मुंबई महानगर पालिकेचा पॅटर्न संपूर्ण नांदेड जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावागावात पण राबविन्यात यावा.

आर्सेनिक अल्बम 30 हे होमिओ पॅथिक गोळी,औषध करोना पॉज़िटिव्ह रुग्णांना घेता येणार नाही. करोना नसलेल्यांनाच ही गोळी घेता येणार आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम(साईड इफेक्ट) नसल्याने या गोळ्या लहान मुला पासून ते वृद्ध व्यक्तिही हे औषध घेवु शकतात. लहान मुले व जेष्ठ नागरिक यांनी मात्र वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांचा सल्ला घेवुनच हे औषध वापरावे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने याची सर्व राज्यांना शिफारस केली आहे.रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.सर्वसामान्यांसह आरोग्य सेविकांनाही या गोळ्या देण्यात येत आहेत.

नांदेड मधील करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता व नांदेड जिल्हा व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व संपूर्ण नांदेड जिल्हा जलद गतीने करोना मुक्त करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रभावी व व्यापक उपाययोजना होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वांना घरा घरात फ्री मध्ये आर्सेनिक अल्बम 30 च्या डोसचे,औषधांचे त्वरित वितरण करण्यात यावे जेणे करून करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल असे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील व दक्षिण विभागप्रमूख प्रशांत बारादे यांनी मागणी केली आहे.