कोरोनाचे संकट ओळखून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच सुरक्षितपणे साजरी करा : धनगर समाजाचे जेष्ठ तथा नेते माजी न.प.उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे

नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड  : रुखमाजी शिंदे

या वर्षीचे कोरोनाचे संकट ओळखून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरांत करा परंतु घरीच सुरक्षितपणे साजरी करा असे आवाहन मुदखेड येथील धनगर समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी न.प.उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी दि.३१ मे रोजी मुदखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट आ करुन उभे आहे,हे संकट रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असल्यामुळे फिजीकल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करावे,तसेच प्रत्येकांनी शक्यतो आपआपल्या घरीच जयंती साजरी करावी,इतरत्र कुठेही गर्दी करु नये असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ नेते तथा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी केले आहे.यावेळी देवदे यांच्यासोबत खंडूजी वड्डे सर,सेवानिवृत पोलीस अधिकारी राम देवदे, मल्लु बिस्मीले,भुजंग फूले,शिवाजी बिस्मीले, मारोती कमजळे,फालाजी चिकाळे,रमेश फूले,गजु कमळे, गजु संभोड,धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत एर्गुले,युवा कार्यकर्ते उपेंद्र देवदे,खिरोजी बिस्मीले आदिसह असंख्य युवक धनगर समाज बांधवांनी जेष्ठ नेते लक्ष्मणराव देवदे यांच्या आवाहनाला संमती दर्शविली.