नागठाणा शिवाचार्यांच्या हत्ये निषाधार्थ अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ या संघटनेच्या वतीने कोल्हापुर येथे जिल्हाअधिकारी यांना निवेदन

इतर बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुर : नांदेड शनिवार दि २४ मे २०२० रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास गुरुवर्य बाल तपस्वी निर्वाण रुद्रपशुपती शिवाचार्य महाराज नागठाणे मठाचे मठाधिपती येथील शिवाचाऱ्यांची निर्घृण हत्या झाली आरोपी साईनाथ लिंगडे या आरोपीस फाशी द्यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हत्ये मागे कोणते कट कारस्थान तर नाही. सदर खटला जलद न्यायलायात सादर करून आरोपीस फाशी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. साधुसंत महाराज यांच्या सुरक्षिततेसाठी कायदा अमलात आणावा या मागणीचे निवेदन कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ लांडगे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

 

त्यावेळी कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था कोल्हापूर तसेच अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ विभाग कोल्हापूर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्ष दयानंद जंगम प्रसाद स्वामी दीपक जंगम नागनाथ जंगम संतोष जंगम रामचंद्र जंगम उपस्थित होते.