नागाठाणा येथील शिवाचार्यांच्या हत्येचा निषेध व राज्यातील सर्व वीरशैव लिंगायत मठाला पोलिस संरक्षणाची मागणी – अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ या संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

इतर बातम्या महाराष्ट्र

वैजनाथ स्वामी 

दि .25 मे राजी नागठाणा ता. उमरी जि.नांदेड येथिल वीरशैव लिंगायत मठाचे श्री ष.ब्र.१०८ बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांची मठात गळा दाबुन निर्घुन हत्या करण्यात आली.

यातील आरोपी पोलिसांनी अटक करून त्यास भोकर न्यायालयाने 29 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

झालेली हत्या हि चोरीच्या हेतुनेच झाली असावी असे जरी प्रार्थमिक दिसत असेल तरीही राज्यातील तमाम समाजाला संशय आहे की हत्या वेगळ्या षंडयत्रातुन केली असावी या मागचा हेतु वेगळा असावा या मागे नेमकं कोनाचा हात आहे.या घटनेची शासनाने सिबीआय किंवा सिआयडी यांचे मार्फत चौकशी करून या हत्ये मागचा हेतु शोधावा.

तसेच राज्यातील तमाम वीरशैव लिंगायत मठांना व शिवाचार्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.
मठ मंदीरात चोर्या होने साधु संतावर हल्ले होने,हत्या होने असे प्रकार आलीकडील काळात वाढले आहेत यावर आळा बसावा यासाठी साधु – संत संरक्षण कायद्याची निर्मिती करून त्यास शासनाने लागु करावे.

अशा अनेक महत्वपुर्ण विषयावर दोन तास चर्चासत्र सुरू होते. लवकरच अखिल महाराष्ट्र शिवाचार्य सभेच्या वतीने मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना रितसर निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला जानार आहे.
तसेच लॉकडाऊन नंतर प्रत्यक्ष भेटी घेतल्या जाणार आहेत. या बाबतीत लातूर जिल्हाअधिकारी जी.श्रीकांत यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज
(मठ संस्थान पाथरी ) कुमार स्वामी गणाचार्य  अ . भा .वी . लिं सचिव) अमोल दुबलगुंडी स्वामी
(संघटक अ.भा. वी. लिं. महासंघ) शुभम अप्पा स्वामी (सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र अ. भा. वी. लिं महासंघ) संघटक प्रमुख अभिजीत दुबलगुंडी स्वामी विजय कानडे (अ. वी. लिं. ज अर्चक महसभा ) आदी  उपस्थित  होते .