मुखेड तालुका हादरला ; पतीने केली पत्नी व मुलाची गळा चिरुन हत्या ; मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील घटना

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक  वर्षाच्या  मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केल्याची घटना दि. २७ मे २०२० रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तानाजी भुताळे वय ३० (अंदाजे) हा येडुर ता.  देगलूर जि. नांदेड  येथील असुन तो मंडलापुर येथे सारवाडीला आला असता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. दि. २७ रोजी दारुच्या नशेत मुखेड – देगलुर रोडवर असलेल्या मंडलापुर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या केली असल्याचे गावातील नागरीकांनी सांगितले. तर  याबाबत  अधिकचा तपास  पोलीस करत  आहे .

आरोपी पळुन जात असताना गावातील नागरीकांनी त्यास पकडुन झाडाला बांधुन ठेवले व पोलिसांना माहिती दिली. घटना कळताच पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सदर घटना कळताच आजुबाजुच्या गावातील नागरीकांनी एकच गर्दी केली.

मयत वैशाली तानाजी भुताळे वय २५ (अंदाजे ) व मुलगा आदेश तानाजी भुताळे वय ०१ वर्ष यांच्या क्रुर हत्येने संपुर्ण तालुका हादरला असुन आरोपींना कडक शासन व्हावे अशी गावकयांतुन मागणी होताना दिसुन येत होती.
तर  आरोपीस  पोलिसांनी  अटक केली  असून  मयताचे  शवविच्छेदन करण्यासाठी  उपजिल्हा  रुग्णालय  मुखेड  येथे  घेऊन  जाण्याची  प्रकिरया चालू  होती .