आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे यांच्या वतीने १००० नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० गोळ्याचे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

शहरात मागील पाच वर्षापासुन जित हाॅस्पीटलच्या माध्यमातुन २४ तास सेवा देणारे आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे यांनी कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सेवा देणा-या कोरोना वाॅरिअर्स तहसिल कार्यालयातील कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार व पत्रकार यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे वाटप केले.


अपडेट  राहण्यासाठी  खालील पेज लाईक करा….

https://www.facebook.com/LokbharatNews/?modal=admin_todo_tour


 

आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप संस्था आणि राजकारण्यांकडून केले जात आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील एका आमदार महोदय त्यांच्या संपुर्ण मतदारसंघात मोफत वाटप करणार आहेत व महाराष्ट्र पोलीस खात्याच्या वतीने संपुर्ण राज्यातील पोलीसांना या गोळ्याचे वाटप करण्यात आले. मुखेड शहरातील कोरोना वाॅरीयर्सना समाजसेवेची आवड असणारे आरोग्यरत्न डाॅ.रणजित काळे यांनी कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे वाटप करुन एक अगळावेगळा उपक्रम राबवला.

तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत तहसिल कार्यालयातील कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी आणी सफाई कामगार व पत्रकार असे २०० कोरोना वाॅरिअर्स व त्यांच्या ८०० कुटुबियांना अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, काँग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे, नगरसेवक विनोद आडेपवार, पईतवार सर, नगर परिषदेचे बलभिम शेंडगे, एनएसयुआय शहराध्यक्ष विशाल गायकवाड, विश्वजित काळे व पत्रकार संदिप पिल्लेवाड हे उपस्थित होते. अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे वाटप केल्याने तहसिलदार काशिनाथ पाटील, नगर परिषदेच्या वतीने नगरसेवक विनोद आडेपवार व सर्व कर्मचा-यांनी डाॅ. काळे यांचे आभार व्यक्त केले.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त आर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथीक औषधीचे तीन डोस सकाळी उपाशी पोटी (एक डोस ६ गोळ्या) घ्यावयाच्या आहेत. पथ्य म्हणुन कच्या कांदा, कच्चा लसुण, लिंबु आणि चहा काॅफी हे तीन दिवसाचा डोस होईपर्यंत घ्यायचे नाही. याच्या परिणामी एक महीना रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही.
                   आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे