मुखेडच्या त्या 72 जणांची माहिती ..अहवाल दिलासादायक  पण धाकधूक कायम..!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
मुखेड तालुक्यांमध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या सापडल्यामुले  त्यांच्या संपर्कात आलेल्या 72 जणांचे नमुने घेऊन पुढे पाठवण्यात आले होते.
त्यात 72 जणांचे अहवाल पुढील प्रमाणे असून त्यात 24 अहवाल प्रलंबित आहेत तर 06 अहवाल पुन्हा घेण्यासाठी सांगितले आहे तर 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 या अहवालामुळे मुखेड तालुक्याला थोडा दिलासा मिळालेला आहे पण धाकधूक मात्र  कायम असल्याचे दिसून येते.
मुखेड तालुक्यातील रावणकोळा येथे दोन रुग्ण आढळल्याने रावणकोळा हे गाव कंटेनमेंट झोन घोषित करून त्या बाजूची हाळणी व चिंचगाव हि दोन्ही गावे बफर झोन घोषित करण्यात आले आहे तर मुखेड शहरातील गायकवाड गल्ली व शिवाजीनगर हे कंटेनमेंट घोषित करण्यात आले तर संपूर्ण मुखेड  शहर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती शक्ती कदम उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे